Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अत्याचार सहन करण्यापेक्षा त्याविरुध्द आवाज उठवा--रेखाताई कदम

ढोकी/सुरेश कदम
समाजातील विकृती त्यामुळे होणारा ञास व आपण सावधानता कशी बाळगावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेखाताई सुरेश कदम यांनी ढोकी येथील तेरणा साखर कारखाना प्रशालेत सखी साविञी मंचच्या वतीने किशोरी मार्गदर्शन मेळव्यात गुरुवार दि.5 रोजी मार्गदर्शन केले.

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलीत तेरणा साखर कारखाना प्रशालेत शिक्षक दिनाच्या औचित्य साधून किशोरी मार्गदर्शन मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना मुलींनी सावधानता कशी बाळगावी याबद्दल उदाहरण दिले तसे अन्याय अत्याचार सहन करण्यापेक्षा त्याविरुध्द आवाज उठवा व सतर्क राहण्याचा मौलिक सल्ला दिला प्रा सुनिता पडवळ यांनी मुलींनी सुरक्षित कसे राहिले पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थीनीनी वसुधंरा वाकुरे,श्रावणी तिवारी,श्रावणी कसबे या मुलीनी कदम व पडवळ मॅडम यांनी आम्हांला अनमोल मार्गदर्शन केले आहे आणि त्यांची आम्हाला गरज आहे असे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करावे म्हणून आभार मानले.


 प्रारंभी डाॅ सर्वापल्ली राधाकृष्णन,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा रेखाताई कदम यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यानंतर दैनिक पुण्यनगरी व कदम परिवाराकडुन शाळेतील सर्व शिक्षकांचा पेन,गुलाब पुष्पगुच्छ व अब्राहम लिंकन यांचे पञ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी मुख्याध्यापक पाडुरंग वाकुरे, मुख्याध्यापक संजय पाटील,दैनिक पुण्यनगरीचे पञकार सुरेश कदम,आशाताई शिल्पा कसबे,सरिता खोत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता पडवळ यांनी तर आभार येवतकर व  शितल टोणगे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments