Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे पाच बुथवर 304 बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर  तालुक्यातील काटी येथे पाच बुथवर 304 बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येत आहे. खानविलकर, साळदे, सत्यपाल, खांडेकर,कपूर, साबत,पोळ,चाटे, सांगळे, खंडेलवाल, पेडकर, शेळके,थोरात अशी नावे आहेत.

रविवार दि. 20 रोजी सकाळी ग्रामपंचायत आवारात घेण्यात आलेल्या चावडी वाचन कार्यक्रमात बीएलओ श्रीमती एम.बी. गुंड, अजित इंगळे, गोविंद जोशी, पंकज काटकर, श्री भूमकर यांनी ग्रामस्थासमोर बोगस ऑनलाईन नोंदणी झालेल्या मतदारांची नावे निदर्शनास आणून देत ही बोगस मतदान नोंदणी रद्द केल्याचे सांगितले. बोगस मतदान नोंदणीसाठी वापरण्यात आलेल्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक हे एकसारखेच असल्याचे निदर्शनास आले. ही बोगस नोंदणी 6 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान झालेली असून रविवारी व सोमवारीही 18 बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचेही बीएलओनी सांगितले. नवीन 18 मतदार नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गेल्या 10 ऑक्टोंबर पर्यंत काटीत 304  बोगस मतदार असल्याचं चावडी वाचन कार्यक्रमात स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता  येत नाही.

मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना बीएलओनी ही बाब स्थानिकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. यामध्ये परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत.

बोगस ऑनलाईन मतदार नोंदणीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments