Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलिस पाटलांनी प्रयत्न करावेत- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज देवकर

सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना सपोनि सुरज देवकर....

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवार दि. 20 रोजी सकाळी तामलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या 27 गावातील पोलीस पाटीलांची तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज देवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना सपोनि सुरज देवकर यांनी सांगितले की,आगामी विधानसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक वातावरण पार पाडण्यासाठी पोलीस पाटील यांनी सतर्क राहून नागरिकांमध्ये आदर्श आचारसंहिता संदर्भात जनजागृती करुन येत्या विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित जाहिरात फलक,बॅनर,लाऊडस्पीकर यासारखे शासकीय स्वरूपाचे फलक तसेच प्रचार रॅली काढण्याच्या दोन दिवस अगोदर सांगावे, मतदानाच्या दिवशी बूथवर व मतदार केंद्रात कोणताही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची खबरदारीही घेण्याचे आवाहन  केले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर,पोलीस उपनिरीक्षक टेकाळे,गोपनीय ठाणे अंमलदार आकाश सुरनर यांच्यासह सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments