तुळजापूर/उमाजी गायकवाड
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विन पोर्णिमा सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह परप्रांतातून मोठ्या संख्येने तिर्थक्षेञ तुळजापूरच्या दिशेने पायी निघाले आहेत. सोलापूर आणि नळदुर्ग रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे अश्विन पौर्णिमेला येथील वातावरण मंगलमय दिसत आहे.
नवरात्र महोत्सव किंवा अश्विन पौर्णिमा कालावधीत किमान एकाने तरी तुळजाभवानी मातेचे चालत पायी वारीने करायचे असा संकल्प अथवा नवस विशेष करून धाराशिव,लातूर, बीड, सोलापूर, बार्शी, अहमदनगरसह कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यातील मंडळीकडून केला जातो. त्यामुळे ते पायी वारीने तुळजापूरला येतात.अलीकडे तर हैदराबाद, सिकंदराबाद,संगारेड्डी,बसव कल्याण,हुमनाबाद येथूनही चालत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली दिसून येत आहे.
कोजागिरी पोर्णिमा बुधवारी असली तरी देविचे अश्विन पोर्णिमा विधी गुरुवारी संपन्न होणार आहेत.
यंदाचा अश्विन पोर्णिमा सोहळ्यास विक्रमी संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. श्रीतुळजाभवानी मातेची पाच दिवसांनी गुरुवारी दि.17 रोजी पहाटे श्रीतुळजाभवानी मुर्ती सिंहासनावर विराजमान करण्यात आल्यानंतर श्री तुळजाभवानी मातेस पहाटे भविकांचे दहीदुधपंचामृत अभिषेकानंतर नित्योपचार पुजा केली जाणार आहे नंतर सकाळी सहा वाजता पुनश्च भाविकांचे दहीदुधष अभिषेक
होणार आहेत.रात्री सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या दोन काठ्या व पालख्यांचे घाटशिळ मार्ग 17 ऑक्टोंबर रोजी तुळजापुरात आगमन होणार आहे.
ठिकठिकाणी अन्नदान वाटप; केशर युक्त मसाला दुधाचे वाटप
बालाजी अमाईन्सच्या वतीने अन्नदान
सोलापूरहून तुळजापूरकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक एन. राजेश्वर रेड्डी व कार्यकारी संचालक डि.राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कंपनी समोर भाविकांना अन्नदान वाटप करण्यात आले.
नळदुर्ग रोडवर श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने साडेतीनशे लिटर दुधाचे वाटप
नळदुर्गहुन तुळजापूरकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांसाठी श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी व महेश पुजारी यांच्या वतीने 350 लिटर केशर युक्त मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच भाविकांसाठी सोलापूर व नळदुर्ग रोडवर ठिकठिकाणी अन्नदान, नाष्टा,चहापाण्याची सोय करण्यात आली होती.
सावरगाव येथे अन्नदान करण्यापूर्वी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करताना....
संतोष दादा मित्र परिवाराच्या वतीने सावरगाव-सुरतगाव रस्त्यावर अन्नदान
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा मार्ग तुळजापूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा)बोबडे मित्र परिवाराच्या वतीने सावरगाव -सुरतगाव रोडवर यशवंत स्टोन क्रशर केंद्रा समोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अन्नदान वाटप करण्यात आले. प्रारंभी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करुन अन्नदान कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संतोष बोबडे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सध्या सोलापूर अक्कलकोट मार्ग कर्नाटकातील भाविक चालत भाविक तुळजापूरकडे मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे बुधवार गुरुवार तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. सध्या बीड लातूर उमरगा बार्शी अहमदनगर तसेच सोलापूर येथून तुळजापूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत आहेत. यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते हे भक्तांच्या गर्दीने फुलून गेले असून बुधवारी जवळपास दहा ते बारा लाख भाविकांनी हजेरी लावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रात्री सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या दोन काठ्या छबिना अग्रभागी घेवुन वर्षातील मानाचा छबिना काढण्यात येणार आहे त्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ,पुजा केल्यानंतर जोगवा कार्यक्रम होवुन अश्विनी पोर्णिमा धार्मिक विधीचा सांगता होणार आहे.
0 Comments