Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भारतीय मानक ब्युरोकडून (BIS) बालाजी अमाईन्स लिमिटेडला पुरस्कार

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व सोलापूर येथील नावाजलेली कंपनी बालाजी अमाईन्स लिमिटेडला भारतीय मानक ब्युरोने (BIS) मानक प्रोत्साहनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात  आले.

सोमवार दि.14 रोजी पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कंपनीचे अधिकारी श्री ए.वाय.कोतवाल यांनी बी.आय.एस. चे संचालक श्री.एस. डी.राणे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारले.

बालाजी अमाईन्स स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली कंपनी....

याप्रसंगी बोलताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक श्री डी.राम रेड्डी यांनी सांगितले कि बालाजी अमाईन्स ही पहिली कंपनी आहे ज्यांनी आपल्या उत्पादनांची निर्मिती ही स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन सुरु केली, याआधी केवळ अमेरिकन अथवा जर्मन तंत्रज्ञान वापरुन अमाईन्सची निर्मिती केली जात होती. सुरुवातीपासूनच कंपनीने तंत्रज्ञान, उत्पादनांची निर्मिती हे स्वतःच्या संशोधन आणि विकास विभागातून निर्माण केले असून. कंपनीने आपली बरेच उत्पादने ही  आयातीला पूरक आणि भारतातून पहिल्यांदा निर्माण करणारे ठरले आहेत. आज जगातील ५० हून अधिक देशांना कंपनी आपली उत्पादने निर्यात करित आहे. 

मॉर्फोलीन हे उत्पादनही कंपनीने भारतात प्रथम निर्माण केलेले असून, अलीकडेच भारतीय मानक ब्युरोच्या कक्षेत आले आहे आणि BIS प्रमाणपत्र मिळविणारी सर्वप्रथम एकमेव कंपनी आहे. कंपनी निर्माण करत असलेली सर्व उत्पादने ही उच्च दर्जाची असून जागतिक निकषांनुसार निर्मिती केली जाते त्यामुळेच आज बालाजी अमाईन्सचे नाव जगविख्यात असल्याचे डी. राम रेड्डी यांनी यावेळी नमूद केले.

Post a Comment

0 Comments