Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी संशोधनात नैतिकतेचा वापर करून गुणवत्ता पूर्ण संशोधन करावेप्र-कुलगुरू- प्रोफेसर वाल्मीक सरवदे

उमरगा:-  संशोधन करीत असताना इकडून तिकडून जमा केलेली माहिती आणि त्याची संकलन न करता विश्वासहार्यता असणारी माहिती आणि त्याचे विश्लेषण करावे. वांग्मयचौर्य नसावे.
महाविद्यालय  विद्यार्थी आणि संशोधक प्राध्यापक यानी संशोधनात    सुसूत्रता आणि संशोधन तंत्राचा वापर करावा आणि संशोधनाची गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यापीठाच्या वतीने  या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा.  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घालून दिलेल्या संशोधनातील नियम आणि अटींचे व नैतिकतेचे पालन करून संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी संशोधन कराव.आणि संशोधन गुणवत्तेचे  करावे असे आवाहन डॉ  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रकुलगुरू,  प्रोफेसर वाल्मिक सरवदे यानी आपल्या उदघाटन पर मार्गदर्शनात केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात    संशोधन पद्धती आणि आराखडा या  विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचे प्रकुलगुरू,  प्रोफेसर वाल्मीक सरवदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात संशोधन हा केवळ माहितीचा संग्रह नसून संशोधनामुळे सामाजिक प्रश्नांची उकल व्हायला मदत झाली पाहिजे, त्यामुळे समाज उपयोगी संशोधन व्हायचे असेल तर संशोधकाने वस्तुनिष्ठता आणि समाज उपयोगिता लक्षात घेतली पाहिजे असे मत छत्रपती संभाजी नगर येथील डॉ . सय्यद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले. ते कल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य शाखेद्वारा आयोजित संशोधन पद्धती आणि आराखडा या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकणी येथील प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव हे होते.

  पुढे बोलताना डॉ सय्यद अझरुद्दीन म्हणाले की संशोधन करत  असताना संशोधन विषयाची निवड अचूक आणि समाज उपयोगी असावी तसेच संशोधकाने संशोधन विषयाची निवड करताना पूर्वीच्या संशोधनाची पुनरावृत्ती टाळावी तसेच संशोधनाचे यश हे अचूक आणि समाज उपयोगी विषयाच्या निवडीवर अवलंबून असल्याने संशोधकाने संशोधनास सुरुवात करण्यापूर्वी संशोधनाचा लघु गोषवारा व्यवस्थित तयार केला पाहिजे. ज्यामध्ये विषयाची निवड संशोधनाची पद्धती, संशोधन विषयाचे महत्त्व, संशोधनाची गृहीतकृत्ये या टप्प्यांमध्ये संशोधनाची सुरुवात करून संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता आणि सामाजिक गरज लक्षात घेतली पाहिजे असे मत  त्यांनी  व्यक्त केले. 

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात धाराशिव येथील डॉ. सुयोग अमृतराव यांनी संशोधकांनी संशोधनाला सुरुवात करताना माहितीचे संकलन कसे करावे, माहिती संकलनासाठी तयार करण्यात येणारी प्रश्नावली कशी असावी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टी विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प आणि क्षेत्रीय अध्ययन प्रकल्प हे अनिवार्य करण्यात आले असून ते तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन रुजवावा लागेल, यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरेल असा विश्वास डॉ.  संजय अस्वले यांनी यावेळी व्यक्त केला. प्राचार्य घनश्याम जाधव यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. 

या प्रसंगी कार्यशाळेसाठी तुळजापूर येथील प्राचार्य  मुकुंद गायकवाड, गुंजोटी येथील डॉ. गुलाब राठोड, प्रा. आर. डी. गायकवाड, डॉ. सहदेव बिराजदार, डॉ. सुधीर पंचगले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ . विनोद देवरकर, डॉ. वसंत हिस्सल, प्रा. मुरळीकर, प्रा. अक्षता बिराजदार, प्रा. संध्या चौगुले, विजय मुळे,  धाराशिव  जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि पदव्युत्तर वाणिज्य विभागातील २०५ सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments