मुरुम:- आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून मंजूर आमदार स्थानिक विकास निधीतून श्री बसवेश्वर चौक सुशोभीकरण करणे 8 लक्ष रु, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रू, 3054 योजनेअंतर्गत आलुर ते मंडगी या रस्त्याची सुधारणा करणे 30 लक्ष रु या कामांचे भूमिपूजन व 2515 योजनेतून महीला ग्रामसंघ इमारत बांधकाम करणे 20 लक्ष या कामाचे लोकार्पण आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
महिलांना कार्यक्रम किंवा एक ठिकाणी जमण्याकरिता कुठलीही जागा उपलब्ध नसल्याने होणारी गैरसोयीबद्दल व्यक्त होत महीला ग्रामसंघ इमारत मंजूर केल्याबद्दल महिलांच्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, मुरूम माजी नगरसेवक शेखर मुदकन्ना, उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब पाटील, शेखर पाटील, राजेंद्र कारभारी,केसरजवळगा सरपंच अमोल पटवारी, कंटेकूर सरपंच शिवाजी जमादार, सोमेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष सोमनाथ काशेट्टी, ग्रा.पं.सदस्य बसवराज लाटे, श्याम कांबळे, काजल ओमशेट्टी, सुमन शिरसागर, मुरूम युवासेना शहरप्रमुख भगत माळी, वैराज कुलकर्णी, दिलीप पोतदार, प्रभाकर कुंजके, परशुराम धोत्रे, अशकर कुलकर्णी, युवा उद्योजक विजयकुमार बिराजदार, अशकर कुलकर्णी, राम काळू, राजकुमार माने, पप्पू समन, लक्ष्मण तावडे, इरफान जमादार व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments