मुरुम/प्रतिनीधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी त्याच्या ध्येयपूर्तीसाठी येणाऱ्या अनंत अडचणीवर सामना कसा करावा याची कौशल्य प्राप्त करावी जिद्द आणि चिकाटी या गुणासह सामान्य विद्यार्थी ते यशस्वी विद्यार्थी असा प्रवास करत यश मिळवावे त्यासाठी आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे असे आवाहन आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात कॉमर्स विभागाचा माजी विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट शंकर जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना केले
येथील भारत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स मंडळ, क्वालिटी सर्कलचे उद्घाटन शंकर जगदाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय शिक्षण घेत असताना विशेषतः कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांनी बँकिंग फायनान्स तसेच मॅनेजमेंट आणि उद्योग -सेवा क्षेत्रामध्ये असलेल्या करिअर संधी आणि त्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकसित करावे आणि आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक प्रदीप पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. विलास इंगळे यांची उपस्थिती होती तसेच व प्राचार्य डॉ पी ए पिटले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॉमर्स मंडळाच्या विविध 17 कमिटी आणि क्वालिटी सर्कलचे , सचिव, सहसचिव व पदाधिकारी, चेअरमन यांचे अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी कॉमर्स मंडळ विद्यार्थ्यांना विविध वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आणि करिअर घडवण्यास मदत करते तसेच कॉलिटी सर्कल च्या माध्यमातून समूह आणि नेतृत्व कसे करावे याचे ज्ञान प्राप्त होते असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डॉ अजित असते आष्टे डॉ व्ही एन हिसल प्रा. सुरज सूर्यवंशी प्रा. मनोज गायकवाड प्रा विजयकुमार मुळे प्रा. खंडू मुरळीकर प्रा.ओम प्रकाश पवार प्रा विद्या गायकवाड प्रा अक्षदा बिरादार प्रा अंजली चव्हाण प्रा राणी बेंबळगे, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
0 Comments