मुरुम प्रतिनीधी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे व लातूर विभागीय मंडळावर सदस्य म्हणून कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथील प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांची महाराष्ट्र शासनाने मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे यांना 30 वर्षे अध्यापनाचा अनुभव असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 70 संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नेपाळ, श्रीलंका या देशात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने त्यांनी अभ्यास दौरा केलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात कै. रसिका महाविद्यालयाने NAAC चा B++ दर्जा प्राप्त केलेला आहे. मागील चार वर्षापासून ते प्राचार्य पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. अनेक राष्ट्रीय पातळीवरील संशोधन परिषदेचे त्यांनी यशस्वी आयोजन केले आहे. वृक्षारोपण, रक्तदान, अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष मा. श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments