Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सामाजिक शास्त्रांमुळेच सामाजिक प्रश्नांची उकल होते - डॉ. संग्राम मोरे

मुरुम/प्रा .डॉ. सुधीर पंचगल्ले 
 सामाजिक शास्त्र हे  मानवाच्या विविध अंगांचा अभ्यास करणारी शास्त्र आहेत, समाजात जीवन जगताना निर्माण होणारे प्रश्न सुटल्याशिवाय आदर्श जीवन जगता येणार नाही, जीवनात निर्माण होणाऱ्या प्रश्नाची उकल झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, या सर्व प्रश्नांची उकल करून जगण्याचा मार्ग दाखवण्याचे काम सामाजिक शास्त्रच करू शकतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संग्राम मोरे यांनी केले. ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते.

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन काल दिनांक २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. संग्राम मोरे यांनी म्हटले की जीवनात निर्माण होणारे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र मंडळाच्या माध्यमातून कार्य करावे, या मंडळाने सामाजिक समस्यांचा अभ्यास करावा आणि समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करावे. अशी सामाजिक शास्त्रेच माणसात समाज भान निर्माण करतात असे प्रतिपादन त्यांनी केले. 

प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये कौशल्ये विकसित करावी. महाविद्यालयातील उपलब्ध सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, डॉ. वसंत हिःसल, डॉ. डी. बी. ढोबळे, डॉ. धनराज इटले, सामाजिक शास्त्र मंडळाचे अध्यक्ष कु. महादेवी सास्तुरे, मंडालील सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मंमाळे यांनी केले तर प्रज्वल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments