तुळजापूर/उमाजी गायकवाड
वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेनंतर अखेर लक्षवेधी ठरलेल्या तुळजापूर विधानसभेसाठी कॉंग्रेसने निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देत कॉंग्रेसकडून ॲड. कुलदीप उर्फ धिरज (भैय्या) अप्पासाहेब पाटील यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना वयाचे कारण देऊन उमेदवारी नाकारली आहे. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी आघाडीवर असलेल्या अशोक जगदाळे व देवानंद रोचकरी यांनाही उमेदवारी नाकारल्याने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, अशोक जगदाळे व देवानंद रोचकरी या तिघांच्याही भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याकरिता अवघे काही दिवस राहिल्याने शनिवार दि. 26 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाने 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.त्यामध्ये ॲड. कुलदीप उर्फ धिरज अप्पासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच महाविकास आघाडीच्या समर्थकांनी तुळजापूर शहरासह तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतीषजी करीत पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले.
निवडणुकीच्या मैदानात महायुती भाजपचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या ॲड.धिरज पाटील यांच्यात लढत होणार असली तरी राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे, अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ ढवळून काढले आहे.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वयाचे कारण पुढे करीत त्यांना उमेदवारी नाकारली आहे. मधुकरराव चव्हाण व अशोक जगदाळे यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले आहे. पाच वेळेस आमदार राहिलेले व एक वेळेस विधानसभा लढविलेल्या मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली नाही. माजी मंत्री चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला असू प्रचारही सुरू केला आहे.
काँग्रेस पक्षाने राज्यातील पहिल्या 48 उमेदवारांच्या व दुसऱ्या 23 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये तुळजापूर मतदारसंघाची उमेदवाराचे नाव नव्हते. मात्र तिसऱ्या 16 उमेदवार यांच्या यादीत तुळजापूर मतदार संघातून ॲड.धिरज पाटील यांना उमेदवारी घोषित केली. काँग्रेसने आतापर्यंत 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व जिल्हा अध्यक्ष ॲड.धिरज पाटील, विश्वास शिंदे हे इच्छुक होते. त्यात कदम पाटील यांनी बाजी मारली.यापूर्वी दोन पाटीलांमध्ये एका कार्यक्रमात वाद निर्माण झाला होता. सध्या तरी तुळजापूर विधानसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध पाटील अशी लढत रंगणार असल्याचे दिसत असले तरी उमेदवारी अर्जाची छाननी होऊन, उमेदवारी माघारी घेतल्यानंतर प्रचाराला खरी सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार, प्रचारात कोण बाजी मारणार या दोन पाटलांमध्ये होणाऱ्या तगड्या फाईटकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments