काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील काटी- धामणगाव रोडवरील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा तुळजापूर शुगरचे चेअरमन यांच्या संकल्पनेतील तुळजापूर शुगर प्रा. लि. या
काटी, ता गूळ पावडर कारखान्याचा चाचणी गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ऊस उत्पादक शेतकरी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
कारखान्याचे चेअरमन ॲड अनिल काळे यांनी कारखाना उभा करण्यासाठी स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा संघर्ष सांगितला. साध्या शेतकरी कुटुंबातून उद्योजक बनण्यापर्यंतचा हा प्रवास किती संघर्षमय होता, याबाबत त्यांनी अनुभव कथन केले.
कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. इंडियन गूळ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने (IJMA) ठरविल्याप्रमाणे उसाला योग्य दर देण्यात येईल, तसेच संपूर्ण बिल दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा केले जाईल असेही त्यांनी सांगितले. ते स्वत: शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सर्व अडी अडचणी सोडविणार असुन शेतकऱ्यांनी कमी खर्चात एकरी 100 टन उसाचे उत्पादन कसे घेता येईल, यावरती लक्ष द्यावं, जेणेकरून रिकव्हरीमध्ये चांगली मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तांबडे यांनी ऊस लागवडीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ऊस लागवड कार्यशाळा घेण्याचे नियोजनही तुळजापूर शुगरसोबत असल्याचे सांगितले.
गुरुवर्य मनुकाका बोधले महाराज ,ॲड लोमटे महाराज,सिद्धिविनायक समूहाचे दत्ता कुलकर्णी ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, रुपा माता परिवाराचे व्यंकटराव गुंड, यांच्यासह अनेक मान्यवरांनी चेअरमन अनिल काळे यांचे कौतुक करत अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
रुपामाता परिवाराचे प्रमुख तसेच इजमा अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी गूळ पावडर कारखान्याच्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती देवुन शेतकऱ्यांनी ऊसाचे चांगले उत्पादन घेऊन आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून कारखान्याच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात सर्व मान्यवर, कर्मचारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी धनंजय शिंगाडे, दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक धनंजय रणदिवे, संतोष बोबडे, प्रभाकर मुळे, विक्रम देशमुख, आदेश कोळी, राम गरड, राजेंद्र धाराशिवकर, मनोज घोगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments