काटी:-तुळजापुर तालूक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाइन्स कारखान्याच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त तामलवाडी ग्राम पंचायत व शिक्षण संस्था यांच्या वतीने संचालक मंडळाचा सोमवारी सत्कार करण्यात आला.
बालाजी अमाइन्स कारखान्याने विस्तारीत युनिट ची निर्मीती कामगारा सह भागातील गावात सी.एस.आर फंडातुन सुविधा देण्याचे काम केले सोमवारी कारखान्याच्या 36 व्या वर्षापन दिनाचे औचित्य साधून तामलवाडी ग्रामपंचायत व सरस्वती विद्यालयाच्या वतीने चेअरमन प्रताप रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, राजेश्वर रेड्डी आदींचा सत्कार केला.
यावेळी माजी सरपंच दत्तात्रय वडणे बाजार समितीचे संचालक यशवत लोंढे मल्लीकार्जुन मसुते उपसरपंच सुधीर पाटील हमीद पठाण बापुसाहेब पाटील बस्वराज मसुते बाळासाहेब जगताप आब्बास पटेल इंद्राजित घोटकर शिवदास पाटील संभाजी माळी कारखान्याचे सी एस आर प्रमुख एम व्ही विराजदार अरुण माशाळ समन्वयक विनोद चुंगे सचिन सुतार दत्तप्रसाद सांजेकर ज्ञानेश्वर घोटकर आदी उपस्थित होते.
0 Comments