तुळजापूर:- तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील संजिवनी माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि.5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग सप्ताह निमित्त दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जटनुरे दयानंद होते.
तसेच यावेळी काक्रंबा येथील केंद्रप्रमुख लोखंडे नितीन पडवळ, तुळजापूर पंचायत समितीतील गटशिक्षण कार्यालयातील बोडरे महादेव,श्रीमती मस्के मॅडम, श्रीमती एकडे वैशाली यांच्या हस्ते पर्यवेक्षक व्यंकट शिंदे यांच्या वतीने देण्यात आलेल्या विद्यालयातील 6 दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुरनूरकर यांनी केले सदरील कार्यक्रमास विद्यालयातील मुख्याध्यापक. पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments