Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

यात्रेकरुंना ग्रामीण रुग्णालयाकडून जागतिक एड्स जनजागृती पत्रकाचे वाटप

                       
 मुरूम/प्रतिनिधी
मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालयाकडून रविवारी, सोमवारी (ता. १ व २) रोजी एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश आरदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव कदम, महादेव शिंनगारे यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागामार्फत विठ्ठल-रुक्माई यात्रेच्या निमित्ताने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून शहरातील नागरिक व यात्रेकरुना एच.आई.व्ही.च्या माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. 

यामध्ये जागतिक एड्स दिन २०२४ मानवी हक्काच्या मार्गावर चालू, एचआयव्ही एड्सबाबत भेदभाव मिटवू, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालयात अधिक माहितीसाठी १०९७ वर इतर आजाराबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी समुदेशक संतोष थोरात, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजयकुमार भोसले यांनी केले. याप्रसंगी मातोश्री डीएमएलटी कॉलेजचे प्राचार्य आकाश गवई व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.                     

मुरूम, ता. उमरगा येथील यात्रेकरूंना ग्रामीण रुग्णालयाकडून एड्स जनजागृती पत्रकाचे वाटप करताना कर्मचारी व अन्य...

Post a Comment

0 Comments