तुळजापूर/प्रतिनिधी
अरण्य गोवर्धन मठात दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अरण्य गोवर्धन मठाचे महंत व्यंकट अरण्य महाराज, महंत मावजीनाथ, महंत हमरोजी व महंत इच्छागीरी महाराज आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
दत्त जयंती निमित्त सकाळी पंचामृत अभिषेक पुजा, दुपारी दत्त जन्म, महा आरती करण्यात आली. तर महाप्रसादाने दत्त जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
शहरातील पंचायत समिती दत्त मंदीरात दत्त जयंती निमित्त आयोजित महाप्रसादाचा शेकडो भक्तांनी लाभ घेतला. दत्त जयंती निमित्त दत्त जन्म उत्सव पाळणा, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आवारात असलेल्या श्री दत्त मंदीरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यजमान अभिजित कुतवळ सपत्निक उपस्थित होते.
दत्त जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आबा कुतवळ, निलेश रोचकरी, रामचंद्र रोचकरी, सचिन सरकाळे, दिपक मोरे, आचारी हामु मोटे यांचा सह गोलाई ग्रुप च्या सदस्यांनी परीश्रम घेतले.
0 Comments