तुळजापूर:-तालुका क्रिडा संकुल येथे क्रिडा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी लॉन टेनिस, साॅफ्ट टेनिस आदि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने खेळाडूंची उपस्थिती होती.
प्रारंभी जेष्ठ क्रिडा मार्गदर्शक हेमंत कांबळे यांचा हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी साॅफ्ट टेनिस असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे, प्रदिप अमृतराव, राजू गायकवाड, राजेश जगताप, काका नन्नवरे आदींची उपस्थिती होती.
क्रीडा मार्गदर्शक इसाक पटेल यांनी प्रास्तावीकात क्रिडा सप्ताह आयोजना मागील हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खेळाडू, शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शेवटी करण खंडागळे यांनी आभार मानले.
0 Comments