धाराशिव/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची भीती जाऊन गणित विषया बद्दल आवड, गोडी निर्माण होण्यासाठी गणित शिक्षकांनी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी केले आहे. भोसले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये आयोजित राष्ट्रीय गणित दिन कार्यक्रमात प्राचार्य नन्नवरे बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य एन. आर. ननवरे, उपप्रचार्य एस. के. घारगे, प्रा. ज्योती शिंदे, प्रा. जे. एस. पाटील, प्रा. पी. एस. माशाळकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य नन्नवरे यांनी परीक्षा तसेच सेमिनार मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी आदर्श महाजन, वैष्णवी काकडे, जान्हवी औताडे, समृध्दी कन्हेरे, स्वराली जाधव, सुल्तान शेख, पठाण तौहीद, लक्ष्मी काटे आदि विद्यार्थ्यांनी गणित तज्ञ रामानुजन यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. यानंतर प्रा. एस. के. कापसे, उप प्राचार्य घारगे यांनी मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य नन्नवरे यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. ज्योती शिंदे यांनी तर सुत्रसंचालन शताब्दी जमदाडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.
या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले
यावेळी गणित परीक्षा तसेच सेमिनार मध्ये उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या सुभान देशमुख, सागर दळवी, समृध्दी कन्हेरे, ओंकार आदलींगे, संचिता पाटिल, सोबणे भक्ती, हरिप्रीया ढेकणे आणि अयाण सय्यद, आर्यन पवार आदि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
0 Comments