Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायतीच्या वतीने घंटागाडीचे लोकार्पण; परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी होणार घंटागाडीचा वापर

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार  दि.24 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायत  सदस्यांसह विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी 3200 डस्टबीनचे वाटप करण्यात आले आहे.

माजी सरपंच शामराव आगलावे यांच्या हस्ते  घंटागाडीचे पूजन करुन लोकार्पण करण्यात आले असून घंटागाडीद्वारे काटीतील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी चांगलीच मदत  होणार आहे.

जिल्हास्तरीय स्मार्ट व्हिलेज अंतर्गत मिळालेल्या 20 लाख रुपये रक्कमेतून 8 लाखांची घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे.

घंटागाडीद्वारे गावातील व बाजारपेठेतील ओला व सुका कचरा संकलित करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरीय  सुंदर गाव अंतर्गत मिळालेल्या 20 लाखांच्या रक्कमेतून काटी ग्रामपंचायतीला घंटागाडी उपलब्ध झाली आहे. या घंटागाडीचे लोकार्पण विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे गावातील व बाजारातील कचऱ्याची समस्या आता मार्गी लागणार आहे. गावातील तसेच बाजारपेठेतील ओला व सुका कचरा उचलण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या घंटागाडीचा वापर करण्यात येणार  आहे.

यावेळी माजी सरपंच शामराव आगलावे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी  चेअरमन  सयाजीराव देशमुख, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, अनिल गुंड, प्रकाश गाटे, ग्रामपंचायत सदस्य भैरी काळे,अमोल गावडे, बाळासाहेब  भाले, अनिल बनसोडे, अरविंद  ढगे, प्रकाश सोनवणे,संपत पंखे , बाळासाहेब  शिंदे,चंद्रकांत  काटे,रामेश्वर लाडुळकर, गोकुळ सोनवणे,प्रशांत सुरवसे,दत्ता छबिले, विलास सपकाळ,सविता बनसोडे, आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments