तुळजापूर:-तब्बल ३५ वर्षानंतर इयत्ता दहावीतील वर्ग मित्रानी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी गुरूजनांचा सत्कार करण्यात आला तर शेवटी शाळेला भेट देण्यात आली. यावेळी एकुण ७० मित्र मैत्रिनींनी उपस्थिती लावली.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल मधील १९९० - ९१ च्या दहावी च्या बॅच चे स्नेह सम्मेलन शहरातील एका हाॅटेलात पार पडले. प्रारंभी तत्कालीन शिक्षकांचे वाजतगाजत समारंभ स्थळी स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी हरिभाऊ रोचकरी, पद्माकर मोकाशे, ए. डी. खोत, सतिश कदम , वरपे, प्रताप हंगरगेकर, श्रीमती वनमाला जाधव, श्रीमती शेवाळे बाई, श्रीमती उषा चव्हाण,अनिल शिंदे, भगवान शिरसट आदी गुरूजनांनी आवर्जून उपस्थिती लावली.
लातूर जिल्हा स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डाॅ. डाॅ. भाऊराव यादव, पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रदिप अमृतराव, बचतगट प्रभाग अध्यक्ष श्रीमती सुनिता इंगळे तसेच पर्यवेक्षिका पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती अनिता बोंदर आदिंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मगर, सुत्रसंचलन शेषनाथ वाघ तर आभार माधुरी दिक्षीत - क्षिरसागर यांनी मानले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात तर प्रसायदानाने सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला डाॅ. भाऊराव यादव, उमेश लोहार, प्रविण कुलकर्णी, सुषमा मलबा-भोसले, श्रीमती सुनिता इंगळे-इस्कांडे, सविता खोपडे, कविता नरवडे - भिसे, रूपाली डाळींबकर - जोशी, प्रतिभा नाईकवाडी - इंगळे, संगिता जाधव, विनय डोईफोडे, अमोल नाईक, राजेश मगर, गणेश दिरगुळे, समाधान कदम, विकास मलबा आदी ७० वर्गमित्र व मैत्रीनींची उपस्थिती होती.
शिक्षकांचा छडीचा प्रसाद
सद्या जरी वर्गातून छडी गायब झाली असली तरी बहुतेक सर्वच वर्गमित्रांना शालेय जीवनात शिक्षकांचा छडी चा मार खावा लागला होता. शिक्षकांनी केलेल्या शिक्षे मुळेच बहुतेक विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकले म्हणून यावेळी आवर्जून छडी आणण्यात आली होती. यावेळी प्रत्येकाने शिक्षकांचा छडीचा उलट्या हातावर प्रसाद घेतला.
0 Comments