Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बीड येथे समाजवादी पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न; 20 नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

तुळजापूर:-रविवार दि. 27 रोजी बीड येथील बशीरगंज जिल्हा कार्यालयात दुपारी  दोन वाजता समाजवादी पार्टी सदस्य नोंदणी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची यशस्वी बैठक पार पडली. 


या बैठकीत जिल्ह्यात 20 नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करुन बीड जिल्ह्यात समाजवादी पार्टीने चंचू प्रवेश केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेश उपाध्यक्ष जोशी म्हणाले की, समाजवादी पार्टीमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेतले जाणार असून त्यांना व  कार्यकर्त्यांना सन्मान दिला जाणार आहे. यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांनी निष्ठेने पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जोशी, प्रदेश महासचिव डॉ.अब्दुल रौफ, समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा भैय्या रोचकरी, प्रदेश सचिव ॲड.शिवाजी कांबळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित पदाधिकारी......

Post a Comment

0 Comments