Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काटी येथे युवकांचा कँडल मार्च


काटी/उमाजी  गायकवाड 
जम्मू-काश्मीरमधील  पर्यटनस्थळ पहलगाममध्ये अतिरेक्यांनी  केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार  दि.28 रोजी काटी येथील प्रमुख मार्गावरून सर्वधर्मिय स्थानिक युवकांनी  कँडल मार्च काढत हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. 

या शांततेच्या आंदोलनातून स्थानिकांनी एकता आणि देशप्रेमाचा संदेश देत पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली.

या कॅन्डल मार्चमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,आदेश कोळी, अनिल गुंड, माजी पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले,ज्ञानेश्वर गुरव, श्रीकांत गाटे,माजी  उपसरपंच जुबेर शेख,अक्षय राऊत, सुनिल शेंडगे, समर्थ रोडे, नदीम काझी, बिलाल ईनामदार, दादा गाटे,सुरेश सांळुके,अमोल देशमुख,सागर ढगे,आकाक्ष सुळे,विकास खरात आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments