Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राज्यातील 16 महिला शिक्षकांना सर फाउंडेशनचा नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीरसोलापूर येथे चार मे रोजी होणार पुरस्कार वितरण

काटी:-शिक्षणाक्षेत्रात विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी कार्य करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व संस्कार रुजवणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यातील सोळा महिला शिक्षकांना स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशनचा राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे . सोलापूर येथील रंगभवन सभागृहात चार मे रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे .

सर फाउंडेशन हे देश स्तरावरील प्रयोगशील व उपक्रमशील शिक्षकांचे नेटवर्क आहे . याद्वारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्ता विकास व शिक्षकांचे सक्षमीकरण साधण्याचा प्रयत्न केला जातो .त्याचाच भाग म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो . महिला शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती , उपक्रमशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत . शिक्षण केवळ पुस्तकी न राहता समाज व प्रत्यक्ष जीवन मूल्यांशी त्यास जोड देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो . राज्यातील विविध जिल्ह्यातील 16 महिला शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे .त्यांनी शिक्षण , समाजकार्य आणि विद्यार्थी सर्वांगीण विकासात मोलाची भर घातल्या प्रित्यर्थ त्यांची निवड तज्ञ समितीमार्फत करण्यात आली आहे . शिक्षण क्षेत्रासाठी भरीव असे योगदान दिल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यास अधिक बळकटी देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या राज्य समन्वयक सौ हेमा शिंदे यांनी सांगितले . पुरस्कार प्राप्त सर्व महिला शिक्षिकांचे सौ . हेमा शिंदे ,श्री सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ , गुणवंत चव्हाण , अनघा जहागीरदार ,वसंत पुरे , समाधान शिकेतोड , मंजुषा स्वामी , उमेश खोसे यांनी पुरस्कार निवडीबद्दल सर्व महिला शिक्षिकांचे अभिनंदन केले आहे.

राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्राप्त शिक्षिका -
प्रतिभा वसंतराव जोशी - अकोला , शीला जानरावजी नसराम -अमरावती , नीता भास्कर अरसुळे - जालना , ज्ञानेश्वरी आनंदराव शिंदे - धाराशिव , योगिनी यल्लाप्पा वैदू - रायगड , सत्यदेवी किशनराव बनवसकर - पनवेल , अंजली कमलाकर स्वामी -लातूर , महादेवी धोंडीराम पाटील - सांगली , मनीषा शंकर रामगुडे - सातारा , मंगला सुरेश नाईकनवरे - सोलापूर ,सोनी प्रभाकर कानडे - माळशिरस , ज्योती सचिन कलबुर्णे - मंगळवेढा ,प्रतिभा सुरेश जाधव - सोलापूर , किशोरी शिवाजी भोर -अहिल्यानगर , अश्विनी चंद्रकांत चव्हाण - सोलापूर .

पुरस्कार प्राप्त महिला शिक्षिकांचे कार्य उल्लेखनीय 
नारीशक्ती सन्मानाच्या माध्यमातून महिला शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी हा कौतुक सोहळा आहे . पुरस्कार प्राप्त महिला शिक्षिकांचे कार्य कौतुकास्पद आहे . शिक्षण क्षेत्रात तळमळीने कार्य करणारे व शिक्षणातील आव्हाने समजून घेऊन आधुनिक तंत्राचा अवलंब करत सेवेला निष्ठेची जोड देणाऱ्या शिक्षकांचा हा समूह आहे .सर फाउंडेशन टीम शिक्षण क्षेत्रासाठी सतत नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवत असते . हा सन्मान सोहळा त्याचाच एक भाग आहे .
                                   सौ. हेमा शिंदे
                     राज्य समन्वयक - सर फाऊंडेशन


Post a Comment

0 Comments