तुळजापूर:-तुळजापूर शहरात रविवार दि. 25 मे रोजी होणाऱ्या सकल मराठा वधु-वर परिचय मेळाव्याची संयोजन समितीची बैठक शुक्रवार दि.2 रोजी सायंकाळी 5 वाजता उत्साहात संपन्न झाली.
येत्या 25 मे रोजी येथील नळदुर्ग रोडवरील संयोजन समितीचे सदस्य गणेश पुजारी यांच्या श्रीनाथ मंगल कार्यालयात सायंकाळी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने वधु-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे, त्याच्या नियोजनासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत महत्वपूर्ण नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्रातील गावागावापासून मराठा समाज विवाहाच्या निमिताने एकत्र बांधण्यासाठी सकल मराठा वधु-वर परिचय मेळावे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो विवाह जुळवून आणण्यात यशस्वी झाले आहेत.
आजकाल धकाधकीच्या आणि धावपळीच्या या जगात विवाह जुळवणे अवघड होवून बसले आहे. पूर्वी मध्यस्थाची भूमिका बजावणारे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून हे काम निस्वार्थीपणे करीत असत. परंतु आजकाल तसे करताना दिसत नाही. सध्या दुसऱ्यासाठी द्यायला वेळ नाही हे वास्तव आहे.अशा परिस्थितीत सकल मराठा समाजाच्या वतीने अविरत सुरू आहे. विशेषत: या सामाजिक कार्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते मराठा वधु-वर मेळाव्यासाठी यथायोग्य सहकार्य करीत आहेत, ही बाब खरंच वाखाणण्यासारखी आहे, असा सूर सदर बैठकीत मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यात व परिसरात मेळाव्याची माहिती देण्यासाठी पोस्टर बॅनर लावणे, व विवाहेच्छूकांना तसेच पालकांना वधु-वर परिचय मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने येण्यासाठी आवाहन करणे, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकी दरम्यान संयोजन समितीमधील अशोक गायकवाड, प्रा.अभिमान हंगरकर,उत्तम (नाना) अमृतराव,गणेश पुजारी,अशोक चव्हाण,सुहास साळुंके,विश्वास मोठे, अमोल निंबाळकर,अशोक ठोंबळ,सतिश पवार,राजु तांबे, चंद्रकांत भांजी,हनुमंत भालेकर,राहुल जाधव,उमाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments