Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वाचन कौशल्य जोपासल्यामुळे मनुष्य ज्ञानाने व अनुभवाने समृद्ध होतो -कवी बालाजी इंगळे


मुरुम/प्रतिनिधी 
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापकांनी सकाळी ८ वाजता ते रात्री ८ वाजेपर्यंत सतत बारा तास पुस्तक वाचन व परीक्षणाचे आयोजन ग्रंथालय विभागामार्फत अभ्यासिकेमध्ये करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक श्री बालाजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलत असताना बालाजी इंगळेंनी वाचनाचे महत्त्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात पुस्तकांना असलेले विशेष स्थान विद्यार्थ्यांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी परीक्षेपुरते वाचन व अभ्यास मर्यादित न ठेवता ही वाचन कौशल्य जोपासली तर मनुष्य ज्ञानाने व अनुभवाने समृद्ध होतो असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले. 
     
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. महापुरुषांच्या जयंती व स्मृतीदिनी त्यांच्या प्रतिमांना फक्त पुष्पहार अर्पण न करता त्यांचा विचार कृतीशील उपक्रमांच्या माध्यमातून रुजवणे ही खरी गरज आहे. त्यांच्या विचाराचा वसा घेऊन तो प्रत्यक्षात आणणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना केलेले अभिवादन होईल. असे प्रतिपादन त्यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. 
  

या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी,  प्रबंधक श्री राजकुमार सोनवणे, प्रभारी प्राध्यापक डॉ. वसंत हिस्सल, ग्रंथपाल डॉ. बी. व्ही चालुक्य, सहाय्यक ग्रंथपाल श्री सतीश जगताप, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, ग्रंथालयीन कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विनोद देवरकर यांनी केले तर रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments