मुरुम/प्रतिनिधी
मुरुम येथील आंबेडकर चौकात महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरिक्षक गव्हाणे, पशुधन अधिकारी देशमुख, दत्ता हुळमजगे, पत्रकार महेश निंबरगे, झुंबर बनसोडे, यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रविण गायकवाड, सतिश सावंत, भास्कर सूर्यवंशी, सतिश भालेराव, गौस शेख, बबनराव बनसोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, आनंद कांबळे, आशिष गवई, किरण गायकवाड, आशुतोष गायकवाड, अमर भालेराव, शुभम सावंत, समीर सोमवंशी, विवेक भालेराव, अमोल बनसोडे, सुरज कांबळे, भैय्या सुर्यवंशी आदींनी पुढाकार घेतला. सुत्रसंचालन अजिंक्य कांबळे तर आभार आकाश गवई यांनी मानले.
मुरूम, ता. उमरगा येथील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालताना मान्यवर पदाधिकारी व अन्य.
0 Comments