येणेगूर /प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येथे ता.6 डिसेंबर 2024 वार शुक्रवार रोजी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके,श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार,कोमल कीर्तने,यांच्या हस्ते करण्यात आले. व तसेच अविनाश दुनगे, कोमल कीर्तने,आम्रपाली गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख गोपाळ गेडाम यांनी केले.या कार्यक्रमासाठी संचालक शंकर हुळमजगे शिक्षक सौरभ उटगे,महेश खंडाळकर,व्यंकट बिराजदार, चंद्रकांत बिराजदार,प्रवीण स्वामी,गोविंद मेडेबणे,प्रा महादेव बिराजदार,प्रा सुरेश जाधव,गणेश जोजन,अप्पू मुदकण्णा,प्रदीप शिंदे,कालिंदी भाले,पार्वती जगताप, शिवकन्या पांचाळ,सुप्रिया झिंगाडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments