Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने धाराशिव येथे मराठवाडा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा; प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ . बापूसाहेब आडसूळ यांची घोषणा

तामलवाडी/प्रतिनिधी 
 स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा विभागीय राज्यस्तरीय आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 12.1.2025 रोजी सकाळी 11 वाजता व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय खासदार प्रमोदजी महाजन सांस्कृतिक सभागृह धाराशिव येथे होणार असल्याचे संयोजक प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा सदस्य पुणे बोर्ड सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसूळ यांनी जाहीर केले आहे.

 पूर्ण राज्यभरामध्ये स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या वतीने शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते .शिक्षण क्षेत्रामध्ये एक सेवाभाव वृत्तीने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजींना प्रेरणा मिळावी व त्यांचे कौतुक होऊन त्याचा फायदा शिक्षण क्षेत्राला व्हावा .असा उद्देश ठेवून ते दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करत असतात . चांगलं कार्य करणाऱ्या गुरुजनांचा विशेष कौतुक होऊन त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त असतात .शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणारे गुरुजन तसेच आदर्श शाळा ,आदर्श मुख्याध्यापक , आदर्श कर्मचारी अशा प्रकारात हे पुरस्कार दिले जातात .याप्रसंगी 55 पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

Post a Comment

0 Comments