Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केमवाडी येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

काटी:- तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे रविवार दि.12 रोजी सकाळी 9:30 वाजता 
सेट गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सलग्न शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदिक रुग्णालय यांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येथील बिरुदेव मंदीरात घेण्यात येणार आहे. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत असल्यामुळे आयुष्य जगण्याकडे दुर्लक्ष होत चालले असल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. नागरिकांनी सतत आनंदी राहणे हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे या उद्देशाने संयोजक बालाजी काळे व ॲड. अनिल काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी  करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे.

तरी या शिबिरात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने संयोजक बालाजी काळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments