Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केमवाडी येथील मोफत सर्व रोग निदान शिबिरात 204 रुग्णांची आरोग्य तपासणी; सर्व रोग तपासणी व उपचार शिबीरास ग्रामस्थांचा उत्‍सफुर्त प्रतिसाद

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे  रविवार दि. 12 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील बिरुदेव मंदीरात संयोजक ग्रामपंचायत सदस्य बालाजी काळे व ॲड. अनिल काळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिरात रुग्णांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या शिबिरात 204 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 

हे सर्व रोग निदान शिबिर व मोफत औषध वाटप शिबीर रविवारी सकाळी 8:30 ते 1:30 वाजेपर्यंत  घेण्यात आले. या शिबीरात एकदिवसीय शिबिरात 204 रुग्‍ण सहभागी झाले यातील सर्व रुग्‍णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. 

अशा प्रकारचे सर्व रोगावरील  मोफत तपासणी व उपचार शिबिर केमवाडी सारख्या ग्रामीण भागात आयोजित झाले असल्यामुळे ह्या शिबीरास रुग्‍णांनी उत्‍सफुर्त असा प्रतिसाद दिला.
          
सदर शिबीरात जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांची  तपासणी व्‍हावी व  उपचार मिळावे याकरीता सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सलग्न शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदिक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
           
कमी कालावधीत जास्‍तीत जास्‍त  रुग्‍णांची तपासणी व उपचार करुन शिबीर यशस्‍वी केल्‍याबद्दल संयोजक  बालाजी काळे व ॲड.अनिल काळे मित्रपरिवारांचे ग्रामस्थांनी  अभिनंदन केले. 

यावेळी संयोजक बालाजी काळे,श्रीकांत धावणे, बाबासाहेब काशिद,हरिदास काळे,अण्णासाहेब कारंडे, विलास भोरे, प्रशांत काशिद,सोमनाथ सातपुते,प्रशांत फंड,पप्पु नकाते, मधुकर खोत-पाटील,बाळासाहेब जतकर,अमोल फंड,बबलू भालेकर आदीं  मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments