काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी, भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव,समोसे,मिसळ पाव,उडीद वडे ,शेंगदाणा लाडू ,शेंगदाणा चिक्की ,इडली, मसाला पापड, भजे, पॅटिस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल जरासंध मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल थोडसरे सहशिक्षिका सुरेखा भुतेकर यांच्यासह गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. या मेळाव्यातून जवळपास दहा हजारांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला.
0 Comments