तुळजापूर:- तुळजापूर शहरातील रोचकरी परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमास शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला. हितगुज करुया मिळून साऱ्याजणी,हळदी कुंकू लेऊ या हक्काच्या अंगणी या उक्तीप्रमाणे स्त्रियांनी एकत्र रहावे हा संदेश रोचकरी परिवाराच्या वतीने देण्यात आला. या कार्यक्रमासाठी शहरातील महिला व बचत गटातील महिलांना निमंत्रित करण्यात आले होते.
हा कार्यक्रम 15 जानेवारी 2025 रोजी तुळजापूर शहरातील एसटी कॉलिनीत सामाजिक कार्यकर्ते निलेश भैय्या रोचकरी व रामचंद्र आबा रोचकरी यांच्या घराजवळील ओपन स्पेसमधील प्रांगणात
हळदी कुंकू कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महिलांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
तिळगुळ वाण, पारंपरिक भेटवस्तू वाटप, तसेच सणाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या समारंभामध्ये सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र (आबा)रोचकरी व निलेश (भैय्या) रोचकरी यांच्या सुविद्य पत्नी सौ. रोहिणी रामचंद्र रोचकरी व कुटुंबातील महिला सदस्य सौ. पुनम निलेश रोचकरी, प्रज्ञा सुधीर रोचकरी, अश्विनी विशाल रोचकरी, नम्रता अमर हंगरगेकर तसेच एसटी कॉलिनीतील महिला भगिनी यांचे हस्ते वाण देण्यात आले.
उपस्थित महिलांनी आपली मते व्यक्त करताना आयोजकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे अभिनंदन केले. श्री रोचकरी परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे समाजातील बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे वचन दिले आहे. रोचकरी परिवाराच्या वतीने आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमास शहरातील जवळपास एक हजारांपेक्षा जास्त महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हळदी -कुंकू कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
0 Comments