Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दोस्ताना व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून 27 वर्षांनी भेटले दहावीतील वर्ग मित्र; शालेय आठवणींना दिला उजाळा

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील 1998 च्या इयत्ता दहावीच्या बॅचमधील वर्गमित्र तब्बल 27 वर्षांनंतर दोस्ताना व्हॉटस्अप गृपच्या माध्यमातून सर्वजण सुट्टीचा दिवस  गाठून रविवार दि. 5 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकत्रितपणे येऊन आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन साजरे झाले.

सगळेचजण आता वयाची 40 ते 45 वर्षे ओलांडलेले. आता त्यांची मुलं, नातवंड शाळकरी वयाची. या सगळ्यांमधला समन्वयाचा धागा एकच होता तो म्हणजे काटी 1998 ची दहावीची बॅच. यामध्ये 1988 मधील इयत्ता पहिलीपासून शिकलेले वर्गमित्रांसह जवळपास 60 जण सहभागी झाले होते.

दहावी नंतर नोकरी-व्यवसाय, कुटुंबासाठी म्हणून सोलापूर, पुणे, मुंबई, धाराशिव, तुळजापूर, रत्नागिरी,कोल्हापूर आदी शहरांसह इतरत्र कोण  वकील,बिल्डर,शेतकरी, व्यवसायिक,ड्रायव्हर, हमाल, गवंडी,बिगारी या सर्व विखुरलेली मंडळींना एकत्रित आणण्यासाठी तब्बल 27 वर्ष लोटली होती. सचिन बापू सातपुते व महेश जमदाडे यांनी दोस्ताना या
व्हॉटस्अप  गृपच्या माध्यमातून महेश जमदाडे,सचिन (बापू)सातपुते, ॲड. अमोल गुंड, अमोल आरगडे, संपत पंखे, बालाजी चवळे, मनोज सोनवणे, तानाजी  हजारे, मोहन जाधव,चॉंद शेख, धनाजी ढगे आदींच्या पुढाकाराने सर्व वर्गमित्र एकत्रित येऊन काटीतील  जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षण घेताना आलेले अनुभव, मिळालेली ज्ञानाची शिदोरी, पुढील वाटचाल यासारख्या गोष्टींना उजाळा देऊन खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलनासह स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

Post a Comment

0 Comments