जय भवानी विविध कार्यकारी सोसायटी सेवा सहकारी
संस्थेची शुक्रवार दि.3 जानेवारी 2025 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पाडली.
या निवड प्रक्रियेत अध्यक्ष म्हणून एस.एन.शिंदे सहकारी अधिकारी श्रेणी दोन सहकारी संस्था तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संचालक मंडळाच्या झालेल्या या बैठकीत युवा नेते विनोद पिटू (भैय्या) गंगणे यांच्या नेतृत्वाखाली हंगरगेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने संस्थेच्या चेअरमनपदी अनिल गजेंद्र हंगरगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर युवा नेते विनोद पिटू (भैय्या) गंगणे यांनी अनिल हंगरगेकर यांचे अभिनंदन केले. तसेच जय भवानी विविध कार्यकारी सोसायटी सेवा सहकारी संस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीने तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास गायकवाड व्हाईस चेअरमन सतीश भोसले यांच्यासह संचालकांनी नूतन चेअरमन अनिल हंगरगेकर शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव महावीर तांबे यांनी कामकाज पाहिले. श्री.अनिल हंगरगेकर यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
0 Comments