Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 100 ताटे, दोनशे वाट्या व 100 ग्लासचेे वितरण

काटी/उमाजी  गायकवाड 
संत सेवा मंडळ सोलापूर यांच्यावतीने तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 100 ताटे, 200 वाट्या, व 100 ग्लासचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.

यापुर्वीही संत सेवा मंडळामार्फत सामाजिक उपक्रम म्हणून अनेक गावांमध्ये गरजवंतांना ताटाचे वाटप करण्यात आले आहे. एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमांतर्गत ताट, वाट्या व ग्लासचे वाटप करण्यात आले. हा वितरण  सोहळा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, सोलापूर व ज्येष्ठ उद्योजक दत्ता सुरवसे यांच्या हस्ते पार पडला. 

या वितरण सोहळ्यात संकुलातील विद्यार्थ्यांना शंभर ताटे ,दोनशे वाट्या व 100 ग्लास देण्यात आले. 

यावेळी मंगरुऊ येथील  वारकरी संप्रदायातील हभप दगडू डोंगरे उत्तम शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, किशोर जाधव, हरी जाधव, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, तसेच विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. 

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगरूळ येथील इंदिरा प्रशालाचे मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे  यांनी सहकार्य केले.

यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित यांनी वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, उद्योजक दत्ता सुरवसे व वारकरी मंडळाचे  मदत दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments