काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी "गाव तसं लहान पण कीर्ती महान" या उक्तीप्रमाणे गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एक अनोखा सलोखा निर्माण करून 1लाख लोकवाटा जमा करून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यमगरवाडी येथे प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात
संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण समिती अध्यक्ष श्री उमाकांत मिटकर व मंगरूळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री मल्हारी माने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यमगरवाडी कदमवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुरेखाताई सलगर, उपसरपंच सौ शकुंतला ताई यमगर, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री लालासाहेब मगर ,तामलवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय गोकुळ ठाकूर, ढोकी पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री किशोर माळी , नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संजय वाले, ग्रामसेवक मार्तंडे साहेब, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुणाताई नंदकुमार, यमगरवाडी गावचे पोलीस पाटील श्री हिराचंद यमगर,श्री कोकरे, श्री राहुल थोडसरे, विजयकुमार गायकवाड, अमोल पवार, दिलीप चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दिप प्रज्वलन व फित कापून उद्घघाटन करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी विविध गाण्यांची बहारदार नृत्य सादर केले या कार्यक्रमात पारंपारिक लोकनृत्य, वेस्टर्न नृत्य,गोंधळ गीत,खंडोबा गीत, देशभक्तीपर नृत्य,पपेट शो, लेझी डान्स,साउथच्या गाण्यावरील नृत्य अशा विविध नृत्य प्रकारांनी कार्यक्रम बहारदार आणि अप्रतिम झाला.
या कार्यक्रमांमध्ये लोकांनी बक्षीसाचा वर्षाव केला एकूण 23 हजार रुपये रोख पारितोषिक शाळेसाठी जमा झाले. गावातील शाळेचा प्रथम सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने सर्व गावातील लोकांचा एकोपा दिसून आला. या कार्यक्रमासाठी निमंत्रित हास्य सम्राट श्री उमेश सुर्वे यांनी सर्व गावकऱ्यांना विविध कलागुणातून मनोरंजन केले.या कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणातील सौ मनीषा हिराचंद यमगर पाटील यांचा सहा महिन्याचा कालावधी संपल्याने त्यांना शाळेतर्फे प्रतिमा देऊन निरोप देऊन सत्कार करण्यात आला.
एक अनोखा उपक्रम म्हणजे यावेळी सर्व गावातील लोकांना गाव जेवण देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, गावातील शिक्षण प्रेमी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी तन-मन-धन रुपी योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी केला. शाळेतील शिक्षिका श्रीमती घोडके एम एस, सौ. मनीषा यमगर पाटील यांनी लहान चिमुकल्यांचे नृत्य सादरीकरणासाठी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश सुर्वे यांनी तर शाळेचे मुख्याध्यापक श्री घोडके ज्ञानेश्वर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्व नागरिकांचे व मान्यवरांचे आभार मानले.
0 Comments