Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांचा वाढदिवस तुळजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांकडून महाआरती व मिठाई वाटपाने उत्साहात साजरा

तुळजापूर/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे  जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य- पाटील यांचा 48 वा वाढदिवस तुळजापूर शहरात मंगळवार  दि. 18 रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आई तुळजाभवानीची महापुजा करण्यात  आली. त्यानंतर तुळजाभवानी महाद्वार चौकात सामुदायिक महाआरती व भाविकांना मिठाईचे वाटप करण्यात आले .

यावेळी भाजपचे प्रदेश  कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे,शहराध्यक्ष शांताराम पेंदे,प्राधिकरणचे माजी सदस्य विकास कदम,उद्योग आघाडी जिल्हा संयोजक राजाभाऊ मलबा,सरचिटणीस धैरशील दरेकर,तालुका सरचिटणीस नरसिंग बोधले, सागर पारडे (युवा सरचिटणीस),इंद्रजीत साळुंके,प्रसाद पानपुढे,युवा मोर्चा शहराध्यक्ष राम चोपदार,लक्ष्मण उळेकर,महादेव रोचकरी,दिनेश बागल (जिल्हा उपाध्यक्ष,)ओबीसी तालुका अध्यक्ष बाबा श्रीनामे ,उद्योग आघाडी अध्यक्ष बाबा घोंगते, बाळासाहेब भोसले,युवा नेते दिनेश क्षीरसागर,अप्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments