काटी/उमाजी गायकवाड
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दिनांक 19 रोजी सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निजामशाही,आदिलशाही,कुतुबशाही, उलथविण्याचे महान कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या विचारांप्रती निष्ठा व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घघाटन तामलवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि गोकुळ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
रक्तदानासारख्या पवित्र कार्यात शिवप्रेमींनी सहभागी होऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी "रक्तदान हेच श्रेष्ठदान" या व्यक्तीला अनुसरून काटीसह परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
मो.नं.9923005236
0 Comments