तुळजापूर :- नळदुर्ग रोड परिसरातील पुजारी नगर, हनुमान नगर मस्के प्लॉटिंग परिसरात
15 दिवसात जवळपास 30 मृत डुक्कर (वराह) आढळून आले आहेत. दैनंदिन मृत डुक्कर सोसायटीत नजरेस पडत असल्याने रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण बनले असून शहरात स्वाईन फ्लू ची साथ आहे का याची खातरजमा करावी यासाठी पुजारी नगर फाउंडेशनतर्फे नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
पुजारी नगर,हनुमान नगर व मस्के प्लॉटिंग परिसरात मृत डुक्करांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, 15 दिवसात जवळपास 30 डुक्कर साथीच्या रोगाचे बळी ठरले असून या साथ रोगाचा परिसरातील रहिवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
सदर परिसरात मोकाट सोडण्यात आलेल्या डुक्करांचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच डुक्कर पालक व्यवसायीकांना सूचित करावे. या साथ रोगाचा प्रादुर्भाव नागरिक वस्तीत वाढ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मोकाट डुक्करांचा लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागतो आहे. तरी याबाबत तात्काळ उपाययोजना करावी असे निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर पुजारी नगर फाऊंडेशन अध्यक्ष गणेश पुजारी,सोमनाथ पुजारी,बालाजी नरवडे, मल्लेश विभुते,विशाल शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
0 Comments