Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त चार दिवसीय सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे ग्रामस्थांच्या वतीने शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सोमवार दि.17 फेब्रुवारी ते गुरुवार दि.20 फेब्रुवारी या कालावधीत येथील भैरवनाथ मंदिराजवळील पिंटू (काका) कुलकर्णी यांच्या घरी
चार दिवसीय सामुदायिक पारायण सोहळ्यासह विविध  धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि. 17 रोजी सकाळी ग्रंथ,दिप प्रज्वलन व कलश पुजन करुन सामुदायिक पारायण सोहळ्याचा शुभारंभ करण्यात येणार असून दुपारी 12 वाजता होणार आहे. मंगळवार व बुधवारी सकाळी 8:30 वाजता पारायण सुरु होणार आहे. तसेच मंगळवारी रात्री 9  वाजता श्री समर्थ महिला भजनी मंडळ व श्रीराम महिला भजनी मंडळाचा जागर होणार आहे. बुधवारी रात्री 9 वाजता गायण सम्राट हभप सुनिल महाराज ढगे यांचे सुश्राव्य हरि किर्तन होणार आहे.  तर गुरुवार दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता सामुदायिक महिला व पुरुष भजनी मंडळाच्या वतीने भजन गायनाचा कार्यक्रम होणार आहे.  दुपारी 12 वाजता गुलाल जन्मोत्सव व महाआरती, महानैवेद्य होणार असून दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

तरी भाविकांनी या उत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे.

Post a Comment

0 Comments