Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायत मार्फत शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 71 रक्तदात्यांचे रक्तदान

काटी/उमाजी गायकवाड 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दिनांक 19 रोजी आयोजित रक्तदान शिबिरात 71 शिवभक्तांनी रक्तदान केले.


येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घघाटन तामलवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि गोकुळ ठाकूर यांच्या हस्ते झाले.

यावेळी  तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकूर,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,उपसरपंच चंद्रकांत काटे,ग्रा स भैरी काळे,प्रकाश सोनवणे,अमोल गावडे,प्रा.जुबेर शेख,बाळासाहेब लोंढे,अनिल गुंड, संपत पंखे,गोकुळ सोनवणे,अनिल बनसोडे,बाळु भाले,मा.सरपंच शामराव आगलावे,प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे,शिवलिंग घाणे,नंदु बनसोडे, ग्रामपंचायत कर्मचारी,अश्विनी ब्लड बॅंकेचा स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments