तुळजापूर,काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील रहिवासी तथा तुळजापूर शहरातील डेंटिस्ट डॉ. राजेश विलास पाटील (दहिवडीकर) यांची हिंदुहृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तृत्वाला स्मरुन शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश प्रमुख डॉ.धनंजय पडवळ यांनी धाराशिवचे पालकमंत्री प्रतापसिंह नाईक यांच्या हस्ते डॉक्टर सेलच्या तुळजापूर तालुका प्रमुखपदी बुधवार दि. 19 रोजी निवड करण्यात आली.
शिवसेना डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉ.धनंजय पडवळ यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण तसेच उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कार्याचा प्रसार व पक्षवाढीसाठी प्रयत्न करावा असे सुचित करण्यात आले आहे.
डॉ. राजेश पाटील दहिवडीकर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
0 Comments