तुळजापूर:- येथील जय बजरंग जय वडार युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रावण पवार यांची सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र धाराशिव जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद,प्रदेश संघटक कोहिनूर सय्यद,राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल आगलावे, सोशल मीडिया प्रमुख प्रा.सतीश मातणे,धाराशिव जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर,जिल्हा उपाध्यक्ष किरण व्हरकट, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे,तुळजापूर तालुकाध्यक्ष संजय गुंजोटे,धाराशिव तालुकाध्यक्ष अमर माने,तानाजी पाटील,सिद्धेश्वर इंगोले,सोमनाथ पूजारी आदी उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायतिच्या विकासासाठी, विविध शासकीय योजना आणि निधी मिळवण्यामध्ये आपण सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी नूतन जिल्हा सरचिटणीस श्रावण पवार यांनी सांगितले.
0 Comments