Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तालुकाध्यक्ष बापू घोंगते व जिल्हा सरचिटणीस श्रावण पवार यांचा सत्कार


तुळजापूर:- शासनमान्य विद्युत ठेकेदार संघटनेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी बापू घोंगते तर सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र धाराशिव जिल्हा सरचिटणीसपदी श्रावण पवार यांची नियुक्ती झाल्याबद्धल पुजारी नगर फाऊंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, उपाध्यक्ष उमाजी गायकवाड,सचिव अनिल आगलावे, कोषाध्यक्ष सोमनाथ पूजारी यांच्यासह रुतेश कवडे,राहुल जाधव,सिद्धेश्वर इंगोले, काशिनाथ राऊत,महेश पुजारी,वैभव ताटे, प्रतीक कांबळे,सौरभ राऊत,नागनाथ पुजारी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी तुळजापूर शहरात  प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय स्नेहमेळावा यशस्वी संपन्न केल्याबद्धल मुख्य संयोजक गणेश पुजारी यांचा ही कौटुंबिक सन्मान केला.

Post a Comment

0 Comments