Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथील मराठा समाज राज्यस्तरीय मेळाव्यात विवाह जुळला; तुळजापूरातील मेळाव्याला यश


तुळजापूर:- तुळजापूर येथे नुकताच सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि.25 मे रोजी तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा पार पडला. मेळाव्यात विवाहइच्छुक  वधू-वरांनी नोंदणी करून आपला परिचय करून दिला.

या मेळाव्याच्या माध्यमातून चि.रुषीकेश सुरेश डेरके रा.तुळजापूर जि.धाराशिव व चि.सो.का.सायली शहाजी लोंढे रा.धाराशिव जि.धाराशिव यांचा विवाह जुळला असून सोमवार  दि. 9 रोजी श्रीनाथ मंगल कार्यालयातच साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या साखरपुडा कार्यक्रमास तुळजापूर येथील मेळाव्यातील यशस्वी संयोजन समितीमधील सर्व सदस्यांना डेरके व लोंढे परिवाराकडून निमंत्रित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments