Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरमध्ये थाटामाटात शाही विवाह सोहळा; राजकीय, सामाजिक मान्यवरांची मांदियाळी

तुळजापूर:- तुळजापूर शहरात मंगळवार, दिनांक 20 रोजी पार पडलेला शाही विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला. तुळजापूरचे राजकुमार तात्या रोचकरी यांचे चिरंजीव भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष
प्रतीक बप्पा रोचकरी यांचा विवाह मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक सज्जनराव साळुंखे यांची कन्या वैष्णवी साळुंखे यांच्याशी अत्यंत दिमाखदार आणि पारंपरिक शाही पद्धतीने संपन्न झाला.

हा विवाह सोहळा केवळ एक कौटुंबिक कार्यक्रम न राहता, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने उत्सवाचे स्वरूप घेत गेले. नवदांपत्याच्या जीवनप्रवासाला आशीर्वाद देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. विवाहस्थळी विविध राज्यांतून आलेले पाहुणे, सुसज्ज व्यवस्थापन, भव्य स्वागत मंडप, आकर्षक स्टेज डेकोरेशन आणि पारंपरिक मराठमोळ्या वाद्यांचा गजर, यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.

वरुणराजाचाही वरदहस्त लाभलेल्या या शुभप्रसंगी पावसाच्या हलक्या सरींनी वातावरण अधिक मंगलमय केले. सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक मराठा पोशाखातील स्वागत, आणि राजेशाही थाट यामुळे उपस्थित प्रत्येकजण भारावून गेला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नववधूच्या आगमनावेळी पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, रथातून केलेले  राजेशाही वराचा प्रवेश. प्रत्येक क्षणात संस्कार, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम दिसून आला.

या विवाहसोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज, वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतीक व वैष्णवी यांना भावी आयुष्यासाठी कोट्यवधी शुभेच्छा व्यक्त करताना उपस्थित मान्यवरांनी दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन केले.

हा शाही विवाह सोहळा तुळजापूरच्या इतिहासात एक संस्मरणीय आणि आदर्श उदाहरण ठरला, अशी सर्वत्र चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments