Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ,नवी मुंबई आयोजित सर्व रोग निदान शिबिरात 468 रुग्णांची तपासणी व औषधोपचार

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार दि.22 रोजी सकाळी 9 ते 4 या कालावधीत येथील ग्रामपंचायत कार्यालयात तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ,नवी मुंबई आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीरात 468 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उद्घघाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या हस्ते सरस्वती  प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.

या शिबिरात हृदयरोग,नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग,त्वचा रोग, कान नाक, घसा रोग,अस्थिरोग पोटाचे विकार आदी रुग्णांची नेरूळ, नवी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच शिबिरातील ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहेत त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पीटल & रिसर्च सेंटर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी सरपंच आदेश कोळी, अनिल गुंड, संजय साळुंके, अतुल  सराफ,रामहरी थोरबोले, धनाजी ढगे,भागवत गुंड, मकरंद देशमुख, प्रताप ढगे,ज्ञानेश्वर गुरव, श्रीकांत गाटे, दीपक गाटे, करीम बेग,नाना सोनवणे, तानाजी सावंत,बापू राऊत, धैर्यशील गाटे,बाळु शिंदे, हेरार काझी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे,दत्ता छबिले,प्रशांत सुरवसे, डॉ.अजित निळे, डॉ.तेजस्विनी शर्मा, डॉ. जिनास शेख,डॉ.निरज पवार,डॉ.भारती उके,डॉ.साक्षी केंशळे,विनोद ओहळ,अमीन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments