Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ज्ञानेश्वर मंदिर टेकडी परिसरामध्ये, अंधश्रद्धा संपविण्यासाठी दुर्डी - दहन कार्यक्रम संपन्न

धाराशिव:-धाराशिव येथील ज्ञानेश्वर मंदिरामागील टेकडीवरील परिसरामध्ये, नागरिकांच्या घरासमोर पर्डी, लिंबू,नारळ, कुंकू  आदी अंधश्रद्धा पसाराविणारा व दैववादी नागरिकांमध्ये मानसिक दहशत निर्माण करण्याचा खोडसाळ उद्योग, मागील वर्षभरापासुन कोणीतरी माथेफिरु नागरिक करत होता. त्याची चर्चा मागिल वर्षभरापासुन या परिसरामध्ये चालू होती. दैववादी नागरिकांमध्ये अनामिक मानसिक दहशत पसरली होती. परंतु यास प्रतिबंध करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नव्हते.

या परिसरात राहाणारे सामाजिक कार्यकर्ते धर्मवीर कदम यांच्या घराजवळ,सदर माथेफिरु व्यक्तीने दुर्डी, नारळ आणि अशा अन्य वस्तू आणून ठेवल्या होत्या. कदम यांनी या अघोरी प्रकारावर चर्चा करण्यासाठी, शेजारी परिसरामधील नागरिकांची बैठक बोलाविली. उपास्थिती सर्वच नागरिकांनी सदर प्रकारास कडाडून विरोध करून, निषेध केला. सदर गूढ साहित्याची सार्वजनिक होळी करून, लोकांच्या मनातील अंधश्रद्धा संपविण्याचे व असे वात्रट उद्योग करणाऱ्या व्यक्तीस लगाम घालण्याचे ठरले. 

ठरल्याप्रमाणे सदर गूढ साहित्याची होळी, परिसरातील धर्मवीर कदम यांच्या रायगड बंगल्यासमोर करण्यात आली. 

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ऍड अजय वाघाळे तसेच यु. व्ही. माने,दादा पाटील, प्रशांत कदम, धर्मवीर कदम,  नेताजी कदम, काटवटे,विलास गपाट, विजयाताई मेटे, विजया कदम,वैशाली कदम,अंजली कदम,शैला गपाट, श्रीमती माने आदी परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते. ऍड अजय वाघाळे, धर्मवीर कदम व विजया मेटे यांनी सदर प्रकारावर मत व्यक्त करताना, "असे प्रकार केवळ अंधश्रद्धा पसरवितात. अशा विक्षिप्त साहित्य ठेवण्याच्या कृती केल्याने कोणाचेही काहीही नुकसान होत नाही. उलट असे प्रकार करणारा व्यक्तीच मानसिक आजराने रोगग्रस्त होतो. नागरिकांनी अशा प्रकाराची अजिबात भीती बाळगू नये. " असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments