Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विक्रमसिंह घोलकर यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

तुळजापूर:-धाराशिव तालुक्यातील पोहनेर येथील विक्रमसिंह अण्णासाहेब घोलकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग १ पदाला गवसणी घातली आहे.  या यशाबद्दल घोलकर यांचा पोहनेर ग्रामस्थांचा वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
    
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत विक्रमसिंह घोलकर यांनी यश मिळवले. घोलकर यांची सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग १ पदी निवड झाली. या यशाबद्वल पोहनेर गावात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याचा अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख होते. व्यासपीठावर पोहनेर गावचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी दिलीपराव देशमुख, माजी सरपंच मोहनराव देशमुख, प्रा. बाळासाहेब घोलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातील तसेच भारत-पाक यध्दात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना श्रद्धाजली वाहन्यात आली.  
  
प्रास्ताविक सज्जन यादव, आभार डॉ. अभयसिंह घोलकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ धावारे यांनी केले. कार्यक्रमाला पोहनेरगावचे आजी, माजी प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
  
करनिर्धारण अधिकारी म्हणून कार्यरत
घोलकर साध्य धाराशिव नगर परिषदेत करनिर्धारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शालेय शिक्षण - छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालय धाराशिव येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे झाले आहे. घोलकर यांनी अभियांत्रिकी पदवी पुणे येथून घेतली आहे. 

Post a Comment

0 Comments