तुळजापूर:-सार्थक संतोष डोंगरे याने ने यु. ९ धाराशिव जिल्हा बुध्दीबळ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत राज्य खुल्या यु. ९ बुध्दीबळ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सार्थक डोंगरे याला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व धाराशिव जिल्हा चेस असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्हा बुध्दीबळ यु. ११ व यु. ९ गट निवड चाचणी पार पडली. या मध्ये यु. ९ गटात सार्थक डोंगरे याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत सोलापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य यु. ९ गट पात्र ठरला आहे. या यशाबद्दल सार्थक डोंगरे चे कौतुक होत आहे.
0 Comments